RBI Repo Rate: कर्जाचा हफ्ता महागणार; आरबीआयकडून व्याज दरात वाढ ABP Majha

Continues below advertisement

RBI Hike Repo Rate : आरबीआयने रेपो दरात (RBI Hike Repo Rate) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा बैठकीत 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्याज दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आरबीआयच्या या निर्णयामुळे रेपो दर 5.40 टक्क्यांवर गेला आहे.

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. आधीच महागाईशी दोन हात करत असलेल्या सामान्यांवर आणखी भार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्याज दर वाढवल्याने बाजारातील खरेदीवर नियंत्रण येते. त्याच्या परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त झालेले प्रमाण काही प्रमाणात संतुलित होते. त्यामुळे महागाईला आळा बसण्यास काही प्रमाणात मदत होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram