RBI Repo Rate : रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा
Continues below advertisement
रिझर्व बँकेकडून सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. रेपो रेटमध्ये यंदा कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्याजदर वाढणार नाहीयेत. गृह कर्जधारकांना हप्ता किमान तीन महिने तरी वाढणार नाही. महागाई आटोक्यात येत असल्यानं आरबीआयच्या रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय रिझर्व बँकेनं घेतला आहे.. मात्र ३ महिन्यांनी रेपो रेट वाढणार का, यावर प्रतिक्रिया देण्यास आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नकार दिला. आखाती देशांनी तेलाचा पुरवठा कमी केल्यानं जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले आहेत. त्याचा परिणाम महागाईवर होऊ शकतो, असंही दास म्हणाले.
Continues below advertisement