LIC share price down : एलआयसीच्या शेअर्सची घसरगुंडी, महिनाभरात गुंतवणूकदारांची निराशा ABP Majha
मोठ्या अपेक्षेने एलआयसीचे शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदरांची निराशा झालीय. एलआयसीचा शेअर काल दोन टक्क्यांनी घटून ७८२ रुपये ४५ पैसे इतका खाली आला. त्यामुळे आयपीओला महिना पूर्ण होण्याआधीच गुंतवणूकदारांचं प्रति शेअर १६५ रुपयांचं नुकसान झालं. बाजारातील या घसरणीमुळे महिनाभरात गुंतवणूकदारांना तब्बल एक लाख कोटी रुपयांचा फटका बसलाय. एलआयसीनं शेअर्सची किंमत ९४९ रुपये इतकी निश्चित केली होती. एलआयसीचा शेअर बाजारात आल्यापासून तो १७ टक्क्यांनी घसरला आहे. एक महिन्याचा लॉक इन कालावधी संपुष्टात आल्यानंतर बडे गुंतवणूकदार बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसं झालं तर शेअर्समध्ये आणखी घसरण होईल, अशी शक्यता तज्ज्ञ वर्तवतायत....