LIC IPO : गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, एलआयसीचा आयपीओ मार्चपर्यंत येणार ABP Majha
Continues below advertisement
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, मार्चपर्यंत एलआयसीचा आयपीओ येणार असल्याची माहिती गुंतवणूक आणि पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट विभागाच्या सचिवांनी ही माहिती दिलीय... त्यामुळे पहिल्यांदाच केंद्र सरकारकडून अधिकृतरित्या एलआयसीच्या आयपीओवर विधान करण्यात आल्यानं गुंतवणूकदार मात्र आनंदित झाले आहेत... एलआयसीचा हा आयपीओ तब्बल १ लाख कोटीहून अधिकचा असणारेय... आतापर्यंत शेअर बाजारात आलेल्या सर्व आयपीओपेक्षा हा मोठा आयपीओ आहे... त्यामुळे शेअर बाजारासह सर्वांच्याच नजरा या आयपीओकडे लागल्या होत्या... नुकताच आलेला पेटीएमचा आयपीओ हा १८ हजार ३०० कोटींचा होता, त्याच्या तुलनेत हा पाचपट असल्याचंही बोललं जातंय... त्यामुळे आता एलआयसीच्या आयपीओच्या या बातमीनंतर शेअर बाजारात उल्हास येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणारेय...
Continues below advertisement