Dollar vs Rupee : डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक पडझड ABP Majha

Continues below advertisement

अमेरिकेत ४१ वर्षांची सर्वाधिक महागाई आणि त्यातच परदेशी गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्यानं डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचं अवमूल्यन सुरूच आहे.. डॉलरच्या तुलनेत काल 24 पैशांची घसरण होऊन रुपया ७९.८८ वर बंद झालाय. काल रुपया ७९.९२ पर्यंत घसरला होता. मात्र नंतर सावरून ७९.८८ वर स्थिरावला .. मात्र आज रुपया डॉलरच्या तुलनेत लवकरच ८० रुपये पार करेल अशी शक्यता आहे. मागील काही महिन्यात रुपयाचे घटते मूल्य चिंताजनक जरी असले तरी आरबीआय रुपया अजूनही मजबूत असल्याचं सांगतेय. इतर ४० देशांच्या चलनाशी रुपया अजूनही पत टिकवून आहे असं आरबीआयचं म्हणणं आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram