Share Market मधील महत्त्वाचे निर्णय योगीच्या सल्ल्याने घेत होत्या Chitra Ramkrishna, SEBIचा आरोप

देशातील राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांनी 20 वर्ष एका हिमालयातील योगीच्या सांगण्यानुसार निर्णय घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडळ म्हणजेच सेबीकडून हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. चित्रा रामकृष्ण यांनी सुब्रमण्यम यांना मनमर्जीप्रमाणे अनेकवेळा पगारवाढ दिली. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कामाच्या मूल्याकंनाचे कोणतेही पुरावे नाहीत, असं सेबीने आदेशात म्हटलं आहे.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola