Union Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या सुविधांवर जास्त लक्ष देण्याची गरज : अर्थतज्ज्ञ

अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प संसदेत सादर करतील...  पायाभूत सुविधांना अधिक निधी उपलब्ध करून देण्यावर आणि इमारती आणि रुग्णालयांसाठी खासगी भागीदारी वाढविण्यासाठी तसेच रुग्णालयातील कामकाजाची क्षमता वाढवण्याची शक्यता  वर्तवली जात आहे.  लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. तसेच या अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार, कृषी क्षेत्रासाठी दिलाशाची पेरणी होणार का?, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. त्याचबरोबर जगातील अनेक देश हे मंदीच्या उंबरठ्यावर आहे, त्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती ही बरीच चांगली आहे... जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे... त्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात काय-काय असणार आहे. याकडे सर्वसामान्यांसह गुंतवणूकदारांचं लक्ष लागलंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola