Union Budget 2022 Expectations : सूक्ष्म, लघु उद्योजकांच्या काय अपेक्षा?

Continues below advertisement

Union Budget 2022-23 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज सकाळी 11 वाजता पेपरलेस बजेट, म्हणजेच डिजिटल अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी 8.15 मिनिटांनी निर्मला सीतारमण आपल्या निवासस्थानाहून रवाना झाल्या. त्यानंतर 9 वाजता त्या बजेट ब्रीफ केससह राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाल्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाला अर्थसंकल्पाची थोडक्यात माहिती देतील आणि त्यानंतर संसदेकडे रवाना होतील. प्रस्थापित परंपरेनुसार, भारताच्या राष्ट्रपतींना सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती दिली जाते. केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रपती कोणतेही बदल सुचवत नसल्यामुळे ही बैठक नेहमीचीच असते. परंतु संसदेत अधिकृतपणे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram