SENSEX : शेअर बाजारानं 60 हजारांचा आकडा गाठला, Share Market Expert जितेश सावंत यांचं विश्लेषण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Sep 2021 12:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShare Market : भारतात शेअर बाजारानं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. मुंबई शेअर बाजारानं नवा उच्चांक गाठला आहे. पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजारानं 60 हजारांचा आकडा गाठला आहे. सकाळी बाजार उघडताच सेंसेक्स 273 अंकानी उसळी घेत 60 हजारांपार पोहोचला. सेंसेक्स 273 अंकांनी वाढण्यासोबतच 60,158.76 उघडला. एक दिवसाअगोदर म्हणजेच, गुरुवारी सेंसेक्स 59,885.36 अंकावर बंद झाला होता. तर गुरुवारी मुंबई शेअर मार्केटमध्ये 958 अंकांची उसळी पाहायला मिळाली होती.