ABP News

Nirmala Sitharaman Budget 2025 : निर्मला सीतारामण आठव्यांदा मांडणार अर्थसंकल्प; सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार?

Continues below advertisement

Nirmala Sitharaman Budget 2025 : निर्मला सीतारामण आठव्यांदा मांडणार अर्थसंकल्प; सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण थोड्याच वेळात देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. सलग आठव्यांदा त्या अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधानांनीही काल याचे संकेत दिलेत. अर्थमंत्री सीतारमण यांनी आज अर्थसंकल्पाची प्रत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सादर केली.  विकासाला चालना देण्याचं मोठं आव्हान अर्थमंत्र्यांसमोर असेल, त्यामुळे आज त्यासंदर्भात कोणत्या घोषणा होतात याची उत्सुकता देशाला आहे. आर्थिक गोष्टींना चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पात भांडवली खर्चात २० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लोकांना खर्च करण्यासाठी अधिक पैसे मिळतील.  

अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

मध्यमवर्गाला आयकरात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता

NPS, EPS सारख्या पेन्शन स्कीमबाबत मोठ्या घोषणा शक्य

आयकराच्या २०%, ३०% स्लॅबमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता

स्टँडर्ड डिडक्शन ७५ हजारांवरून १ लाख रूपये होण्याची आशा

कॉर्पोरेट टॅक्समध्ये दिलासा मिळण्याची शक्यता कमी

१०० अमृत भारत रेल्वे गाड्या सुरू होण्याची शक्यता

१० हून अधिक वंदे भारत गाड्या सुरू होण्याची शक्यता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram