Maharashtra Budget 2021| राज्याचा अर्थसंकल्प सादर, अर्थमंत्री अजित पवार यांचं संपूर्ण भाषण

मुंबई : कोरोना काळात महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेत आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. तसेच अर्थसंकल्पात महिलांसाठीही महत्वाच्या तरतूदी करण्यात आल्या. "शुभशकूनांचं तोरण तू, मांगल्याचं औक्षण तू, झिजतानाही दरवळणारं देवघरातील चंदन तू, स्त्री नसते वस्तू, ती नसते केवळ जननी, ती असते नवनिर्मितीची गाथा, जिथे आपण सर्वांनीची टेकावा माथा" असं म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठीच्या खास तरतूदी स्पष्ट केल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola