Budget 2024 Kolhapur : अर्थसंकल्पावर कोल्हापुरातील सामन्य परिवाराला काय वाटतं?
Continues below advertisement
अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं. कररचनेत कोणताही बदल या अर्थसंकल्पात नाही. त्यामुळे आता करदात्यांना जुलैमध्ये सादर होणाऱ्या बजेटची वाट पाहावी लागणार आहे. मध्यमवर्गाला स्वतःचं हक्काचं घर घेण्यासाठी योजना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात जाहीर केली. युवा, गरीब, महिला आणि शेतकरी वर्गासाठी योजनांची घोषणा सीतारमण यांनी केली. 2047 पर्यंत भारताला विकसीत भारत करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलंय. आयुष्मान भारत योजना यापुढे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनाही लागू असणार आहे. लखपती दीदी योजनेचं लक्ष्य २ कोटींवरून ३ कोटी करण्यात आलंय.
Continues below advertisement
Tags :
Budget Modi Government Kolhapur Nirmala Sitharaman Budget 2024 Union Budget 2024 Interim Budget 2024