
ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 01 February 2025
ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 01 February 2025
अर्थसंकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, काही क्षणात सादर होणार देशाचा अर्थसंकल्प, एबीपी माझावर सोप्या भाषेत बजेट
सर्वसामान्यांना अर्थमंत्री मोठा दिलासा देण्याची अपेक्षा, १० लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची चर्चा, १५ ते २० लाखांच्या स्लॅबमध्येही पाच टक्के करकपातीची शक्यता
अर्थसंकल्पाकडून शेतकरी, महिला आणि तरुणांना मोठ्या अपेक्षा, अर्थमंत्री सीतारण यांच्या घोषणांकडे लक्ष
शेअर मार्केटच्या पडझडीला ब्रेक लावण्यासाठी अर्थमंत्री सीतारमण कोणत्या घोषणा करणार याची उत्सुकता, रूपयाची पडझड सरकार कसं सावरणार? थोड्याच वेळात उत्तर
विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या नव्या योजना, मोदी सरकारच्या घोषणांकडे साऱ्यांच्या नजरा
मुंबई एमएमआरमधील रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून तीन रुपयांनी महाग, रिक्षाचं किमान भाडे २६ तर टॅक्सीचं किमान भाडे ३१ रुपये