Traders Demand:व्यापाऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा,महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा दावा #Lockdown
लॅाकडाऊनमुळे सात लाख व्यापाऱ्यांचे 70 हजार कोटींचे नुकसान झाले असा दावा महाराष्ट्र चेंबर्स ॲाफ कॅामर्सने केलाय. आर्थिक कारणांमुळे महिनाभरात सात व्यापार्यांनी आत्महत्या केल्यात. त्यामुळे नियम पाळून व्यापार सूरू करू देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ते शक्य नसेल तर छोट्या दुकानदारांसाठी किमान दहा हजार रूपये मदत द्यावी अशी संघटनेची मागणी आहे.