VIDEO | तरुणांच्या मानसिकतेविषयी 'सरहद'च्या संजय नहार यांच्याशी चर्चा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
Continues below advertisement
काश्मिरातील तरूणाईनं एका ठराविक कळत्या वयात फक्त हिंसाचार पाहिला आहे. आपण नक्की कोण आहोत, कोण होऊ शकतो हे कळण्याच्या, समजण्याच्या वयात ही तरूणाई दहशतवादाच्या छायेत राहिली आहे. नक्की लष्कराविरोधातील वाद, वैचारिक भरकटलेपण यांमुळे काश्मिरी तरूण अनेकदा टीकेचे धनी झालेत. आणि आता पुलवामा हल्ल्यानंतर पुन्हा एकदा काश्मिरी तरूणांच्या मानसिकतेवर बोट ठेवलं गेलं. त्यामुळे आज आपण काश्मिरी तरूणांसाठी आयुष्यभर काम करणारे संजय नहार यांच्याशी बातचित करणार आहोत. त्यांच्या सरहद्द संस्थेतील काश्मिरी विद्यार्थ्यांची भावना काय असते हेही जाणून घेणार आहोत.
Continues below advertisement