Affordable Tour | हवाई पर्यटन तज्ज्ञ मंदार भारदे यांच्याशी खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | ABP Majha
विमानात बसून जगाची सफर करायचं स्वप्न आपल्या सगळ्यांचंच असतं.. अगदी जग भटकायला नाही मिळालं तरी आपण राहातो ते शहर, एखादं पर्यटनस्थळ याची हवाई सफर काही वर्षांपर्यंत श्रीमंती हौस म्हणून बघितली जायची.. पण आता ही परिस्थिती थोडी बदलू लागली आहे.. लग्नापासून ते ईमर्जन्सीपर्यंत जवळची ही हवाई वाहतूक अधिक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू लागली आहे. आणि यामध्ये महत्वाचा वाटा आहे मंदार भारदे यांचा. मॅब एव्हिएशन ही कंपनी त्यांची फक्त कंपनी नाहीए, तर त्यांचं असं एक अपत्य आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांच्या डोळ्यातली हवाई वाहतुकीची स्वप्न पूर्ण केली आहे. ज्या माध्यमातून त्यांनी गरजूंना हेलिकॉप्टर प्रवास त्वरित देऊन वैद्यकीय उपचार पुरवले आहे. नेत्यापासून पेशंटपर्यंत, आणि जोडप्यापासून ते वऱ्हाडी मंडळींपर्यंत, ज्यांच्या डोळ्यांमध्ये त्यांनी आकाश सामावलं अशा हवाई पर्यटन तज्ज्ञ मंदार भारदे यांच्याशी आपण बातचित करणार आहोत.