VIDEO | औषधांविना बरे व्हा! पुण्याच्या डॉक्टर निखिल मेहतांशी बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
डॉक्टरांक़डून कडू औषधं घ्यायला आणि इंजेक्शन टोचून घ्यायला तसं कुणालाच आवडत नाही.. अगदी चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत.. डॉक्टरांची औषधं नकोतंच असाच स्वर असतो..आता तुम्हाला असं सांगितलं की असे एक डॉक्टर आहेत जे तुम्हाला अजिबात औषध देत नाहीत पण तरीही तुम्हाला खडखडीत बरं करतात तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण पुण्यातले डॉक्टर निखील मेहता औषधं न देताच त्यांच्या रुग्णांना बरं करतात. त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास केलेला आहे पेशंट त्यांच्याकडे गेल्यानंतर ते त्याच्या आहारा-विहाराची पूर्ण माहिती घेतात, पेशंटच्या दिनचर्येमध्ये आवश्यक तो बदल सुचवतात व केवळ त्या बदलामुळे रुग्ण बरा होतो.