ब्रेकफास्ट न्यूज : राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपाचा दुसरा दिवस

Continues below advertisement
वाढीव विद्यावेतनासाठी शिकाऊ डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. कमीत कमी 15 हजार वेतन देण्याची मागणी या शिकाऊ डॉक्टरांनी केली आहे. राज्यभरातील शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील इंटर्नशिपचे विद्यार्थी हे कालपासूनच बेमुदत संपावर गेले आहे. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर झाला आहे. विशेष म्हणजे आज दुसरा दिवस असला तरीही संपावर तोडागा काढण्यात सरकार अपयशी झालं आहे. तात्काळ वेतनवाढ करा आणि फेब्रुवारी 2018 पासून ही वेतनवाढ लागू करा, या दोन मागण्या लगेचच पूर्ण करण्याची मागणी असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न अर्थात आस्मी या संघटनेने केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram