VIDEO | बिग बॉसच्या घरात दर दोन तासांनी माणूस बदलतो, घरातून बाहेर पडलेल्या माधव देवचकेशी बातचीत | ABP Majha

बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन कमालीचा हॅपनिंग आहे. कधी स्पर्धकांमधल्या वादामुळे तर कधी स्पर्धकांचा धक्कादायक एक्झिटने या सीझनची जोरदार चर्चा होते. यावेळी घरातून बाहेर पडलाय माधव देवचके. माधवचा घरातला वावर सर्वसमोवेशक होता. माधवची अभिजीत बिचुकलेंसोबतची मैत्री, माधवचं अनेक गोष्टीत हायपर होणं, माधवचं पटापट बोलणं, माधववर कन्फ्युज्ड असा टॅग लागणं हे सगळं या घरानं पाहिलं.
-----------
पण या घरात कुणाला मन मोकळं करायचं असेल, कुणाला विश्वासानं काही सांगायचं असेल तर माधवला पर्याय नव्हता. आणि म्हणूनच माधव घराबाहेर पडताना सगळ्यांनाच रडु कोसळलं . एक स्पर्धक म्हणुन माधव जरी कमी पडला असला तरी एक माणुस म्हमुन या घरात त्याने सगळ्यांची मनं जिंकल्याची भावना सगळ्यांच्या मनात आहे. माधव आज आपल्यासोबत आहे आणि बिग बॉसच्या घरातला अनदेखा सीन आपण त्याच्याकडून जाणुन घेऊया

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola