VIDEO | जगभ्रमंती केलेल्या विष्णूदास चापके यांच्याशी खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

कुठल्याही नव्या ठिकाणी जायचं तर आपली किती तयारी असते.आणि त्यातही नवा देश अनुभवायचा असेल तर आपल्या आजूबाजूचा प्रत्येक जण आपल्याला सूचना,सल्ले देत असतो. पण आज आपल्य़ासोबत असा एक धाडसी तरूण आहे ज्यानं परदेशवाऱ्या केल्या तेही कोणत्याही नियोजनाशिवाय. ३ वर्ष ३ दिवस जगाला प्रदक्षिणा घालून ठाण्याचा तरूण विष्णुदास चापके मायदेशी परतला.
विष्णुदासनं यादरम्यान ३५ देश आणि ४ खंड पालथे घातले.. क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून त्यांनी पैसे गोळा केले. कोणताही अनावश्यक खर्च न करता कमीत कमी साधनांमध्ये त्यांनी अनेक संस्कृती, जीवनशैली अनुभवल्या. कधी त्यांना रेल्वे स्टेशनवरही रात्र घालवण्याची वेळ आली. पण जगभ्रमंती करण्याचं वेड त्यांना स्वस्थ बसू देईना. आता मायदेशी परतल्यानंतर विष्णदास चापके यांच्याशी आपण खास बातचित करणार आहोत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola