VIDEO | काँग्रेसला सोडचिठ्ठीनंतर प्रतीक पाटील यांच्याशी खास बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
जत तालुक्यातल्या गिरगावपासून के आटपाडी तालुक्यातील राजेवाडीपर्यंत वसंतदादांचा नातू म्हणून प्रतिक पाटील यांना अफाट जनप्रेम मिळालं. अनेकदा तर नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला राहिली. आणि प्रतिक पाटील यांच्यावर विजयाचा गुलाल उधळला गेला. पण ज्या नेत्याला लोकांचं एवढं प्रेम लाभलं, वसंतदादांसारखा वारसा लाभला ते काँग्रेसपासून का दुरावतायत? अशा कोणत्या अपेक्षा आहेत ज्या पूर्ण होऊ शकल्या नाहीएत? या प्रश्नांची उत्तर थेट प्रतिक पाटील यांच्याकडूनच जाणून घेऊया.