VIDEO | काश्मिरी तरुणांच्या 'गाश बँड' टीमशी खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

सध्या पुण्यातला एक बँड सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय. कारण या बँडमधले कलाकारही खूप खास आहेत. आपल्या लहानपणी काश्मिरातील हिंसाचारात पोळून निघालेल्या या काश्मिरी तरुणांनी एकत्र येत या बँडची स्थापना केलीये. हिंसा आणि द्वेषाच्या अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा संदेश या बँडच्या माध्यमातून ही मुलं देत आहेत.
सरहद संस्था आणि अरहम फाउंडेशन यांनी 'गाश'चा कार्यक्रम आयोजित केला. काश्मीर मधील विविध भागांमधून आलेली हे तरुण संगीताच्या प्रेमापोटी एकत्र आले आहेत. 'गाश' हा काश्मिरी शब्द असून त्याचा अर्थ प्रकाश असा होतो. संगीतामधून प्रेम, शांती आणि अमनचा संदेश देऊन हे तरुण 'गाश' च्या माध्यमातून देशभर आपली कला सादर करणार आहेत. 'गाश'च्या माध्यमातून काश्मीरचं सांगितिक वैभव ते देशात पोहोचवणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola