VIDEO | शिवरायांची अतिभव्य रांगोळी साकारणाऱ्या सौंदर्या बनसोडशी गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

जवळपास नऊ एकरांचा परिसर, अवघ्या १२ वर्षांची कलाकार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळीतून साकारलेली पूर्णाकृती प्रतिमा.
अहमदनगरच्या कोपरगावातली सातवीत शिकमारी सौंदर्या बनसोडने महाराजांची भव्य दिव्य रांगोळी रेखाटण्याचा संकल्प केलाय. एकुण चार लाख चाळीस हजार स्वेअर फुटांवर छत्रपती शिवरांयांची प्रतिमा साकराण्यासाठी ही मुलगी सध्या दिवसरात्र मेहनत घेतेय.२६ जानेवारीपासुन तिने या कामाला सुरुवात केलेली असुन १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जंयतीदिनी ही कलाकृती पूर्ण करण्याचा तिचा मानस आहे. आजवरचा सर्वात मोठ्या रांगोळीचा रेकॉर्ड हा चार लाख स्वेअर फुटांवर रांगोळी काढण्याचा आहे पण आता सौंदर्या तो रेकॉर्डही मोडण्याच्या मार्गावर आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola