ब्रेकफास्ट न्यूज : 'पुष्पक विमान' चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेशी गप्पा

आजच्या पिढीचा अष्टपैलू नायक कोण असा प्रश्न विचारला तर तमाम सिनेसृष्टीतून एक नाव समोर येतं, या कलाकाराने 'बालगंधर्व' साकारले. शिवाय टिळक, काशीनाथ घाणेकर करताना त्याने 'कट्यार...' सारखा सिनेमा दिला आणि आता चरित्रपटातून काम करणारा हा अभिनेता आता आपल्याला दिसणार आहे एका प्रेमळ नात्यावर बोलताना.

'पुष्पक विमान' या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलेला अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे रसिकांसाठी एक गोड गोष्ट घेऊन आला आहे. त्याचा 'पुष्पक विमान' हा सिनेमा या शुक्रवारी येतोय. या सिनेमाच्या निमित्ताने सुबोधने निर्मिती क्षेत्रात आणि वैभव चिंचळकर यांचं दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि सुबोध भावे या दोघांचं आजोबा-नातू हे नातं कसं फुललं? सुबोधचे यापुढचे प्लॅन्स काय आहेत, निर्मिती क्षेत्रातला अनुभव कसा आहे? या सगळ्याविषयी गप्पा मारण्यासाठी सुबोध भावे आज आपल्यासोबत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola