VIDEO | ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्याशी खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
ज्यांच्या व्यंगचित्रांचा अभ्यास आजही केला जातो, ज्यांची व्यंगचित्रं आजच्या काळातही समर्पक वाटतात त्या बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनात विकास सबनिसांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. आता त्यांच्या व्यंगचित्रांच्या कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने त्यांचा विशेष सत्कार आयोजित केला गेला आहे. विकास सबनीस यांनी जेव्हा त्यांच्या कलेची सुरूवात केली तीच मुळात प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशिर्वादानं. त्यांच्यातील व्यंगचित्रकार घडला, वाढला तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या साक्षीनं.आणि आता विकास सबनीस यांच्या कारकिर्दीला ५ दशकं होत असताना त्यांच्या या आठवणी, ते त्यांच्या कुंचल्यांतून काय सांगू पाहात आहेत, हे सर्व आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत.