ब्रेकफास्ट न्यूज : प्रियांका चोप्रा-निक जोनास अमेरिकेतील हवाईत लग्नगाठ बांधणार
अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकन सिंगर आणि बॉयफ्रेंड निक जोनाससोबत अमेरिकेतल्या हवाईमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती मिळते. तर प्रियांकाच्या लग्नात तिची खास मैत्रीण आणि ब्रिटीश शाहीघराण्याचं नवदाम्पत्य प्रिन्स हॅरी आणि मेघन मर्केलही उपस्थित राहण्याची चर्चा आहे. यावर्षी मे महिन्यात मेघनच्या शाही विवाहसोहळ्याला प्रियांका चोप्रानं हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वीच प्रियांका आणि निक यांचा मुंबईत साखरपुडा झालाय.