ABP News

Guru purnima 2019 | अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि दिग्दर्शक सतीश आळेकर याचं गुरु-शिष्य नातं कसं आहे? | ABP Majha

Continues below advertisement
आपण अर्जुनासाठी एकलव्याचा अंगठा मागणाऱ्या द्रोणाचार्यांची गोष्ट ऐकली असेलच. पण ती झाली गोष्ट. आज आपण गप्पा मारणार आहोत खऱ्या आयुष्यातल्या अशा एका द्रोणाचार्यांशी, ज्यांनी अतिशय सर्वसामान्य घरांतील विद्यार्थ्यांमधल्या कलाकार हेरला. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे संचालक म्हणून काम पाहाताना, अगदी ज्यांना अभिनयाची पार्श्वभूमी नाही अशा अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं आहे.
आणि यातलीच त्यांची विद्यार्थीनी मुक्ता बर्वे. मुक्ताचीही खरंतर कौटुंबिक पार्श्वभूमी तुमच्या आमच्यासारखीच. मुक्ताच्या घरीही नाटकाचं वातावरण फार नव्हतं. पण मुक्ता आणि तिच्यासारख्या अनेकांना अभिनयाची खरी दिशा सतीश आळेकर यांनी दिली. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचे आळेकर सर जवळचे मित्र झाले. आज गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं आपण या दोघांशीही संवाद साधणार आहोत. मुक्ता आपल्यासोबत मुंबईत आहे.तर सतीश आळेकर सर पुण्याहून आपल्यासोबत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram