VIDEO | 'बेस्टसेलर'चं कोणतं नवं पुस्तक येणार? तरुणांना वेड लावणारा लेखक सुदीप नगरकरशी गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

Continues below advertisement
आज आपल्यासोबत आहेत लेखक सुदीप नगरकर. सुदीप हे बेस्टसेलर लेखकांपैकी एक आहे. तरुण वर्गात त्यांची पुस्तकं इतकी वाचली जातात की त्यांचं कोणतंही नवं पुस्तक विकत घेण्यासाठी अक्षरशः रांगा लागतात.
सुदीप खरंतर पेशानं इंजिनिअर, एका मध्यमवर्गीय मराठमोळ्या कुटुंबात जन्मलेले. पण लिखाणाची त्यांची आवड त्यांना इतकं यश मिळवून देणारी ठरली की सुदीपचं पहिलं पुस्तक 'FEW THING LEFT UNSAID' प्राकशित झाल्य़ावर त्याला तुफान प्रतिसाद मिळाला आणि पूर्ण वेळ लिखाणासाठी सुदीपने आपल्या आयटीक्षेत्रातल्या नोकरीलाही रामराम ठोकला.
सुदीप यांनी २०११ मध्ये आपलं पहिलं पुस्तक लिहलं. या पुस्तकाला मिळालेला प्रतिसाद इतका मोठा होता की काही दिवसातच या पुस्तकाच्या विविध भाषांमधल्या आवृत्त्या आल्या. आपल्या देशात रोमँटीक कथा लिहणाऱ्या लेखकांच्या नावांमध्ये सुदीप यांचं नावं आघाडीवर आहे. .
उत्तम लेखनाबरोबरच सुदीप उत्तम वक्तेही आहेत. मोटीव्हेशनल स्पीकर म्हणून त्यांचा भाषणाचा चाहता वर्गही मोठा आहे. यासोबतच काही मराठी सिरिअरलासाठी संवाद लिखाणाचं कामंही ते करतात. आता त्यांचं नवं पुस्तक आलंय "सिक्रेटस् वी कीप..." थेट तरुणाईच्या मनाला भिडणाऱ्या उत्तम कथा लिहणाऱ्या लेखकाशी आपण गप्पा मारुया
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola