वज्रासनाचे फायदे | घे भरारी | योग माझा | एबीपी माझा
‘वज्र’ म्हणजे इंद्राचे अस्त्र. या आसनामध्ये पायांची बैठक वज्राप्रमाणे पक्की असते. म्हणूनच याला वज्रासन म्हणतात. ‘व्रज’ याचाच अर्थ ‘जननेंद्रिय’ असासुद्धा होतो. या आसनाच्या सरावामुळे विशेषत: जननेंद्रियावर व ओटीपोटावर लाभदायक परिणाम होतो. योगाभ्यासासाठी योग्य अशी शांत, एकाग्र मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती वज्रासनामुळे लवकर साध्य होते. म्हणून सुरुवातीला हे आसन केल्यामुळे पुढील योगाभ्यास उत्तम होतो.