बीड | केजमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात अदखलपात्र गुन्हा
अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात बीड जिल्ह्यातील केजमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे बीडचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या तक्रारीनंतर केज पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. राज ठाकरे आणि मनसेविरोधात बोलून तनुश्रीने राज ठाकरे आणि पक्षाची अब्रु घालवली, म्हणून अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचं सुमंत धस यांनी सांगितलं.