Bandra Skywalk | वांद्रे कलानगरचा स्कायवॉक आज रात्री पाडला जाणार | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
मुंबईत स्कायवॉक उभारण्याची संकल्पना आल्यानंतर सर्वात प्रथम कलानगर जंक्शन ते वांद्रे स्टेशनला जोडणारा स्कायवॉक उभारण्यात आला होता. सी लिंकपासून-वांद्रे कुर्ला संकुलापर्यंत जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वांद्रे येथील स्कायवॉक तोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या स्कायवॉकचं तोडकाम आजपासून सुरु होत आहे. या कामासाठी पश्चिम द्रुतगती मार्गावर शनिवारी आणि रविवारी रात्री 11 ते पहाटे 5 च्या दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. स्कायवॉकची दक्षिणेकडील मार्गिका (सी लिंक दिशेकडील) शनिवारी रात्री 11 ते रविवारी पहाटे 5 या वेळेत, तर उत्तरेकडील मार्गिका रविवारी रात्री 11 ते सोमवारी पहाटे 5 या वेळेत तोडण्यात येणार आहे. या कामासाठी वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएला परवानगी दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram