Manmad Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान, सातबारावर पीकपेरांची नोंदच नाही

सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला.. काढणीला आलेलं पीक अक्षरश: जमीनदोस्त झालं...अस्मानी आणि सुलतानी संकटांनी भरडलेल्या शेतकऱ्याच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला..या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने कांद्याला प्रति क्विंटल ३५० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केलं..मात्र अनुदान मिळण्यासाठी काही अटी शर्ती देखील घालून दिल्या. दरम्यान अनुदान मिळवण्यासाठी बाजार समितीत आता अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालीये.मात्र नाशिकमधल्या मनमाडमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर पीकपेरा नोंद न झाल्यानं अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहाण्याची शक्यता आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola