कर्ता शेतकरी ।भाग 10।‘निरोगी आत्मस्वीकार’ ।सह्याद्री फार्म्स ।IPH । ABP माझा
Continues below advertisement
प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या वागण्या-बोलण्याकडे लक्ष ठेऊन असते, इतरांच्या त्यावर काय प्रतिक्रिया येत आहेत, इतरांना मी कसा / कशी वाटत आहे हयाकडेही आपलं लक्ष असतं. आपल्या भवतालच्या अनेक गोष्टींचा प्रभाव आपल्यावर होत असतो. समाजाच्या ह्या साऱ्या बाह्य परिमाणांमध्ये मी कसा बसतो? सामाजिक चौकटीत मी स्वत:ला कसा जोखतो? या सगळ्या गोष्टी माझ्या स्वप्रतिमेशी जोडलेल्या आहेत. आणि हि स्वप्रतिमा माझ्या विचारांशी जोडलेली आहे. मी स्वतःला कशा प्रकारे स्वीकारतो यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. या सर्वात आपण आपला स्वीकार कसा करायचा? हे जाणून घेऊ सह्याद्री फार्म्स प्रस्तुत, आवाहन / आय. पी. एच. निर्मित ‘कर्ता शेतकरीच्या’ या भागात राजकुमार तांगडे आणि डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून.
Continues below advertisement