VIDEO | साध्वीचं वक्तव्य हा शहीदांचा अपमान नाही का? | माझा विशेष | एबीपी माझा
मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा हीने पुन्हा एक संतापजनक वक्तव्य केलं आहे. शहीद हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला, असं विधान साध्वी प्रज्ञाने केलं आहे. ती भोपाळमधल्या एका कार्यक्रमात बोलत होती. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात माझ्याविरोधात पुरावे नसतानाही हेमंत करकरेंनी कारवाई केली, असा दावा साध्वी प्रज्ञाने केला आहे.