Election Commission | निवडणूक आयोग मोदींवर मेहरबान? | माझा विशेष | ABP Majha

Continues below advertisement
कोलकातामध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या मंगळवारी झालेल्या रोड शो दरम्यान झालेल्या राड्यानंतर निवडणूक आयोगाने प्रचाराचा अवधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयेवरून काँग्रेसने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, आज लोकशाहीतील काळा दिवस आहे. कारण आज निवडणूक आयोगाने केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचार सभा घेण्याची परवानगी दिली आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालमध्ये दोन प्रचारसभा आहेत. या प्रचारसभा संपल्यानंतर म्हणजे रात्री 10 वाजेपासून पश्चिम बंगालमध्ये प्रचार बंदी लागू होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram