VIDEO | सर्जिकल स्ट्राईक 2.0 पुरावे मागण्याची घाई का? | माझा विशेष | एबीपी माझा
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत हवाई हल्ले करुन दहशतवाद्यांची तळं उध्वस्त केली. या हल्ल्यात 350 दहशतवादी ठार झाल्याचा दावा भारत सरकारने केला आहे. भारत सरकारने या कारवाईसंदर्भातील पुरावे जगाला दाखवावे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांनी मांडली आहे.