VIDEO | 'जय हिंद' म्हणायला विरोध का? | माझा विशेष | एबीपी माझा

भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे.. ही प्रतिज्ञा अगदी शाळेत असल्यापासून आपण शिकतो.. पण भारतमातेचा उदोउदो करण्याबाबत मात्र नजिकच्या काळात चेष्टेचा विरोधा सूर वारंवार आळवला जाताना दिसतोय.. याआधी वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणांसंदर्भात विरोध झाला.. ही वाक्य म्हणणे यावरूनही वादग्रस्त विधानं झाली आणि ही वाक्य म्हणण्यास विरोध करतानाही वादग्रस्त विधानं झाली. इतकंच काय तर लोकांच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्न उपस्थित केले गेले आणि त्याची चेष्टाही झाली.. आता पुन्हा एकदा विरोध, चेष्टा असा सूर अशाच एका घोषणेबाबत होतोय.. ती घोषणा आहे. जयहिंद. एअर इंडिया या विमान कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक सूचनेनंतर जयहिंद म्हणण्यासंदर्भातलं एक पत्रक प्रशासनानं काढलंय.. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी या वाक्याची विरोधवजा चेष्टा करताना एक ट्विट केलं की निवडणुका जवळ आल्यानं देशभक्तीच्या जोशानं आकाशालाही सोडलं नाही.. आणि त्यानंतर नेटिझन्स मधून याची जोरदार चर्चा व्हायला लागलेय.. अर्थात मुद्दा चर्चेचा आहेच कारण देशभक्तीची चेष्टा होताना दिसतेय.. असं का घडतंय जयहिंद ला विरोध का.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola