712 | यवतमाळ | डेक्कन साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा
जिल्ह्यातील डेक्कन साखर कारखान्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा वाढीव दर अजुनही दिला नाही. यामुळे हजारो शेतकऱ्यांनी काल मंगरुळमधील या कारखान्यावर मोर्चा काढला. आणि कारखान्याच्या गेट समोर ठिय्या आंदोलन सुरु केलं. पैसे मिळेपर्यंत आंदोलन सुरु राहणार, असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय. डिसेंबर २०१७ पर्यंत गाळप झालेल्या ऊसाला २,२५० रुपये प्रति टन असा दर मिळाला. मात्र त्यानंतर १८०० रुपयांनी कारखान्यानी ऊसाची खरेदी केली. आजुनही प्रति टनाचे वरचे साडे ४०० रुपये शेतकऱ्यांना मिळाले नाहीयेत. यासाठीच शेतकऱ्यांनी डेक्कन साखऱ कारखान्यासमोर आंदोलन सुरु केलंय.