712 | हवामानाचा अंदाज | कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सिमेने महाराष्ट्रात प्रवेश केल्याचं दिसून येतंय. उत्तर महाराष्ट्रातील काही भाग या रेषेने व्यापल्याचं आपल्याला दिसून येतंय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळतोय. येत्या २४ तासात ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.