712 | मान्सून अपडेट | हवामानाचा अंदाज
राज्यात पावसाचा जोर कमी झालेला दिसून येतोय. या सॅटेलाईट इमेजमधून आपल्याला सध्याची ढगांची स्थिती बघता येईल. यात दाखवल्याप्रमाणे उत्तर विदर्भाकडे ढगांची दाटी बघायला मिळतेय. काही प्रमाणात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावरही ढग दिसून य़ेतायत. आयएमड़ी म्हणजेच भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील. तर कोकणात मुसळधार पाऊस होईल, असा इशाराही देण्यात आलाय.