712 | वर्धा | सोयाबीन पिकावर खोडमासी, पिवळा मोझॅक आणि मर रोगाचा प्रादुर्भाव
राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोश सुरु असताना वर्ध्यातील शेतकरी मात्र चिंतेत सापडलाय. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर ऐन पिकाच्या वाढीच्या काळात नवं संकट ओढवलंय. पीक पिवळं पडून वाळून जातंय. शेंगा भरण्याच्या आधीच पीक वाळून जातंय. संपूर्ण शेत पिवळं पडल्यानं खर्च निघेल इतकं तरी उत्पादन मिळेल का, याची शाश्वती राहिली नाहीय.