712 | मुंबई | हळद उत्पादनात भारत जगात अग्रेसर
भारत हा जगातील सर्वाधिक हळद उत्पादक देश आहे. जगातील एकूण हळद उत्पादनापैकी ७५ टक्के उत्पादन भारतात होतं. वाढतं उत्पादन आणि मागणीमुळे देशातून हळदीची मोठ्या प्रमाणात निर्यातही होतेय. गेल्या ५ वर्षांपासून देशातून हळदीची ८ ते १० टक्के निर्यात होत होती. ती आता १२ टक्क्यांवर गेलीये. यंदा हळदीच्या उत्पादनातही २० हजार टनांची वाढ होण्याची शक्यता तज्ञ वर्तवतायत यंदा देशात एकूण ४ लाख ६० हजार टन हळदीचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे.