712 | देशात 39 लाख 73 हजार टन साखरेचं उत्पादन
गेल्या वर्षी विक्रमी साखऱ उत्पादनामुळे साखर उद्योगावर मोठा आर्थिक ताण पडला. साखर उत्पादनात भारताने ब्राझिलला मागे टाकलं. यंदाही अशाच उत्पादनाचा अंदाज वर्तवला गेला आहे. आता गाळप हंगाम सुरु होऊन महिना दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. नुकताच साखर कारखान्यांची संघटना इस्माने आतापर्यंतच्या साखर उत्पादनाची आकडेवारी जाहीर केली. 30 नोव्हेंबरपर्यंत देशात जवळपास 39 लाख 73 हजार टन साखरेचं उत्पादन झालं आहे. गेल्या वर्षी याच काळात एवढचं साखरेचं उत्पादन झालं होतं. राज्यात या काळात 18 लाख 5 हजार टन साखरेचं उत्पादन झाल्याची माहिती आहे.