712 | साखरेची किमान आधारभूत किंमत 36 रुपये किलो करावी- इस्मा
साखर उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. हीच परिस्थिती लक्षात घेऊन इस्मा या देशातील साखऱ कारखानदारांच्या संघटनेने सरकारला महत्त्वाची मागणी केलीय. साखर कारखान्यांना ७० लाख टन साखर निर्यात करणं बंधनकारक करण्याची मागणी इस्मानं केलीये. साखरेच्या उत्पादनाची आकडेवारी पाहता मोठ्या प्रमाणात साखऱ निर्यात करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफआरपी देण्यासाठी मान्यता देण्याचीही विनंती केली जातेय. तसच साखरेची किमान आधारभूत किंमत २९ रुपयांवरुन ३६ रुपये प्रति किलो करण्याची मागणीही इस्मानं केलीये.