देशातील रब्बी पेऱ्यात घट | 712 | एबीपी माझा
देशभरात सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीचा काळही सुरु आहे. देशात आतापर्यंत 414 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली. दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाई या कारणाने देशातील रब्बी पेऱ्यात घट झाल्याचं दिसून येतं आहे. यात भरडधान्याच्या पेरणीमध्ये २५ टक्क्यांनी घट झाली आहे. तर भाताच्या पेरणीतही 36 टक्क्यांची घट झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या वर्षीच्या पेरणीच्या आकडेवारीनुसार यंदाच्या पेरणीमध्ये 6.2 टक्क्यांनी घट झाली आहे.