712 | राज्यात पोळा उत्साहात साजरा, विदेशी पर्यटकांचीही हजेरी
रविवारी राज्यातील प्रत्येक गाव जणू लाडक्या बैलांच्या सजावटीमध्ये रंगून गेला होता. पोळा या सणासाठी गावागावात बैलांच्या शर्यतीही आयोजित करण्यात आल्या. काही ठिकाणी पारंपरिक गीतांवर ताल धरत शेतकऱ्यांनी सण साजरा केला. तर काही ठिकाणी हा सण पाहण्यासाठी विदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली.