712 | पालघर | गणेशोत्सवाच्या देखाव्यात एकात्मिक शेतीचे धडे
पालघरच्या डहाणूमधील वेती गावात गणपतीसाठी अनोखा देखावा तयार करण्यात आलाय. एकात्मिक शेतीसंबंधी शेतऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या हेतुने हा देखावा तयार करण्यात आला. नवतरुण गणेश मंडळाने कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा तयार केला. यात सेंद्रीय शेती, लागवडीच्या नव्या पद्धती, कृषी पर्यटन यांचे देखावे तयार केले. तसच मत्यशेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, आळिंबी उत्पादन, रेशीम उत्पादन, जलसंवर्धनाच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. सेंद्रीय शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जिवामृत, शेणखत, कंपोस्ट खत कसे तयार करावे याबाबत मार्गदर्शन देण्यात आलं.