712 मुंबई: दुधाची पावडर बनविणाऱ्या संस्थांना 3 रुपये अनुदान मिळणार

Continues below advertisement
दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी आता दुधाची पावडर बनविणाऱ्या संस्थांना 3 रुपये अनुदान मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.दूधाला 10 मे पर्यंत योग्य भाव मिळाला नाही तर आंदोलन करु असा इशारा किसान मोर्चाच्या वतीनं देण्यात आला होता. त्यानंतर आता दुधाला भाव मिळावा म्हणून सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत. तीन टक्के अनुदानाचा लाभ 14 खासगी तर 6 सहकारी संस्थांना मिळणार आहे. सध्या 26 हजार मेट्रिक टन दूध पावडरचा साठा केला जातो. त्यात 20 टक्क्यानं वाढ होईल.आणि 44 लाख लिटर दुध पावडर बनविण्यासाठी वापरात येईल. आता या निर्णयानंतर तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळतो का हे पाहणं महत्वाचं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram