712 | लातूर | कृषी कर्ज वाटपासाठी स्कायमेटद्वारे ड्रोन, सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर
राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांवर आधारित पीक कर्ज द्यायचं असतं. बऱ्याच वेळेला तलाठी कार्यालयात बसूनच पेरणी अहवाल देतो. त्यामुळे बोगस कर्ज वाटली जातात. यावर स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने तोडगा काढलाय. याबाबत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी स्कायमेटच्या रिमोट सेन्सिंग आणि जीआयसीचे प्रमुख डॉ. सुधाकर मांडा यांच्याशी संवाद साधलाय.