कृषी मंत्रालयाकडून 'किसान सुविधा' अॅप लाँच | 712 | एबीपी माझा
शेतकऱ्यांना शेतीसंबंधीची माहिती कोणत्याही ठिकाणी सहज उपलब्ध व्हावी यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं नवीन अॅप लाँच केलंय. किसान सुविधा असं या अॅपचं नाव आहे. या अॅपवर पुढच्या ५ दिवसांच्या हवामानाचा अंदाज मिळवता येतो. बाजारभाव, मृदा आरोग्य आणि शेती विषयी तज्ञांचा सल्लाही या अॅपमुळे शेतकऱ्यांना मिळवता येईल. शेतीसंबंधीच्या समस्यांसाठी शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. मात्र या अॅपमुळे तात्काळ आणि नेमकी माहिती मिळवता येणारेय.